शनिवार, ३१ मे, २०२५

भाजपाने जाहीर केली उर्वरित जिल्हाध्यक्षांची यादी

 


मुंबई, दि. ३१ मे २०२५: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता पूर्वी घोषित न झालेल्या उर्वरित जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे

यामध्ये कोकण विभागातून पालघर जिल्ह्यासाठी श्री. भरत राजपूत आणि वसई विरार जिल्ह्यासाठी श्रीमती. प्रज्ञा पाटील यांची निवड झाली आहे.

उत्तर महाराष्ट्र विभागातून अहिल्यानगर शहरसाठी श्री. अनिल मोहिते, नाशिक शहरसाठी श्री. सुनील केदार, नाशिक दक्षिणसाठी श्री. सुनील बच्छाव आणि नाशिक उत्तरसाठी श्री. यतीन कदम यांची निवड झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्र विभागातून पुणे दक्षिण (बारामती) साठी श्री. शेखर वढणे आणि कोल्हापूर शहरसाठी श्री. विजय जाधव यांची निवड झाली आहे.

विदर्भ विभागातून गडचिरोली जिल्ह्यासाठी श्री. रमेश बारसागडे, चंद्रपूर शहरसाठी श्री. सुभाष कासमगुट्टवार, चंद्रपूर ग्रामीणसाठी श्री. हरिष शर्मा आणि वर्धा जिल्ह्यासाठी श्री. संजय गाते यांची निवड झाली आहे.

यामध्ये मराठवाडा विभागातील परभणी ग्रामीणसाठी श्री. सुरेश भुबंरे, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी श्री. किशोर शितोळे, लातूर शहरासाठी श्री. अजित पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीणसाठी श्री. बसवराज पाटील, नांदेड उत्तरसाठी अँड. किशोर देशमुख, नांदेड दक्षिणसाठी श्री. संतुकराव हंबर्डे आणि बीड जिल्ह्यासाठी श्री. शंकर देशमुख यांची निवड झाली आहे.

मुंबई विभागातून उत्तर पश्चिम मुंबईसाठी श्री. ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईसाठी श्री. निरज उभारे आणि दक्षिण मुंबईसाठी श्रीमती. शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे.

 यापूर्वी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ विभागातील उर्वरित जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली होती.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

 #Maharashtra #BJP #DistrictPresidents #Politics #PartyNews #Marathwada #Mumbai

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा