पुणे: कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीतील मोक्का गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी सांगली येथून अटक केली आहे. बाळकृष्ण ऊर्फ पांडया लक्ष्मण मोहिते (वय ४०, रा. एस. टी. स्टॅण्ड रोड, उमा लेले यांचे खोलीत, सितारामनगर, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला १४ मे २०२५ रोजी पहाटे ४:०० वाजता ताब्यात घेण्यात आले.
कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात गजानन मारणे यास न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर त्याला शासकीय वाहनाने सांगली मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येत होते. त्यावेळी बाळकृष्ण मोहिते व त्याच्या साथीदारांनी पुणे, सातारा व सांगली येथील ४० ते ५० लोकांना एकत्र करून आरोपीला आर्थिक व इतर मदत केली. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले आहे.
पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त श्री. निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बाळकृष्ण मोहिते याला सांगलीतून ताब्यात घेण्यात आले. गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्याची चौकशी केली असता, त्याचा गुन्ह्यातील सहभाग उघडकीस आला. त्यामुळे त्याला १४ मे २०२५ रोजी १२:३० वाजता अटक करण्यात आली.
या कारवाईसाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. गणेश इंगळे यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर आणि पोलीस अंमलदार मोकाशी, कुंभार यांच्या पथकाने सहभाग घेतला. आरोपीला १७ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
-------------------------------------
#PunePolice
#Arrest
#Gangster
#GajananMarne
#MCOCA
#Sangli
#CrimeNews
#Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२५ ०५:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: