लोणीकाळभोर पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा दाखल, आरोपी फरार
पुणे: लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेकरवस्ती, थेऊरफाटा येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात अज्ञात चोरट्याने घुसखोरी करून तब्बल १२,०२,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ मे २०२५ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास विश्वकमल बंगला, आंबेकरवस्ती, पुणे-सोलापूर रोडजवळ घडली. अज्ञात चोराने फिर्यादी महिलेच्या घरातील देवघराच्या खिडकीचे लोखंडी गज अज्ञात हत्याराच्या साहाय्याने उचकटले.
त्यानंतर याच मार्गाने घरात प्रवेश करून चोराने वृद्ध महिलेला हत्याराचा धाक दाखवला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, चोराने तिला हत्याराच्या उलट्या बाजूने मारून जखमी केले. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ५,००० रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून तो फरार झाला. आरोपी अद्याप फरार असून, लोणीकाळभोर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
----------------------------------------------------------------------------
#Pune #Burglary #Robbery #Theft #LoniKandhborPolice #CrimeNews #TheurPhata #MaharashtraPolice #HouseBreakIn #SeniorCitizenSafety
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा