शनिवार, २४ मे, २०२५

शिवसेना उरणतर्फे खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार


उरण : खासदार श्रीरंग  बारणे यांना आठव्यांदा संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना उरण शहर प्रमुख सुलेमान शेख यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख अतुल भगत, महेंद्र पाटील, मिशन बॉस मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहसीन शेख आदी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी बारणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---------------------------------------------------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा