गुरुवार, २२ मे, २०२५

ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने महिलेला ३६ लाख ५० हजार रुपयांचा गंडा

 


पुणे - गुरुनानक पोलिस ठाण्यात आणखी एक मोठी फसवणूकीचे प्रकरण उघडकीस आले आहे. चतुःश्रंगी भागातील ४४ वर्षीय महिलेची ३६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

२५ फेब्रुवारी ते ३ मे २०२४ या कालावधीत फिर्यादी महिलेला ऑनलाइन माध्यमातून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले. फसवणूकखोरांनी तिला सांगितले की ते मोबाइल लिंक वापरकर्ता आणि विविध बँक खातेधारक आहेत.

फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिचे मोबाइल लिंक पाठवून अकाउंट तयार करण्यास सांगितले. त्यानंतर तिला कोणताही परतावा न देता ३६ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली गेली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ४१९, ४२० आणि आयटी अॅक्ट ६६(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ननावरे (गुन्हे)  यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.

---------------------------------------------------------------------------------------

#OnlineTradingFraud #InvestmentScam #CyberCrime #WomenSafety #FinancialFraud #PunePolice #DigitalScam #TradingScam

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा