पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींसंदर्भात हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले.
या बैठकीत ११ वीच्या प्रवेशाच्या नियमावलीत (जी.आर.) आवश्यक बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सीईटीप्रमाणे सोपी असल्याचा दावा केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात अनेक अडचणी येत आहेत.
हिंदू महासंघाने या प्रकरणी लक्ष घालून राज्यभरातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा आणि न्यायासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
#11thAdmissions#Education #Maharashtra #Pune #Hindu_Mahasangh #Online_Process
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०४:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: