सोमवार, १९ मे, २०२५

महिला पोलिसावर पाच वर्षे अत्याचार: पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल

 


नवी मुंबई: महाराष्ट्रात पोलीस दलातील एका धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पनवेल येथे एका पोलीस उपनिरीक्षकाने महिला पोलीस कर्मचारीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे आणि त्याची आई  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनुसार, २०२० मध्ये नेरे येथे या महिला पोलिसाच्या पेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. एवढेच नव्हे तर आरोपीने पीडितेचे अर्धनग्न फोटोदेखील काढून ठेवले होते. तसेच हे फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन आणि लग्नाचे आमिष दाखवून मागील पाच वर्षांपासून तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करत होता. पीडित महिलेने अखेर धैर्य दाखवून याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

--------------------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा