पुणे: पोलीस असल्याचे सांगून तरुणाला २०.२४ लाखांचा गंडा

 


पुणे: येरवडा येथे राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणाची पोलिसाच्या नावाने बतावणी करत मोठी फसवणूक झाली आहे. अद्न्यात आरोपीने मोबाईलवरून फ़िर्यादीशी संपर्क साधला आणि स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे खोटे सांगून आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत तब्बल २०,२४,५३१ रुपयांची फसवणूक केली आहे.

या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ४१९ (व्यक्तीची बतावणी करणे), ४२० (फसवणूक करणे), १७० (सरकारी नोकर म्हणून बतावणी करणे) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० मे ते १३ मे २०२४ दरम्यान घडली.

आरोपीने फिर्यादी तरुणाचा विश्वास संपादन केला आणि त्याच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली त्याने फिर्यादीकडून मोठी रक्कम उकळली. फसवणूक केल्यानंतर आरोपीने संपर्क तोडला आणि तेव्हा फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

सदर मोबाईल धारक आरोपी अद्याप फरार असून, येरवडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

-----------------------------------------------------------

#Pune #CyberFraud #PoliceImpersonation #MoneyLaunderingScam #FinancialFraud #YerawadaPolice #Maharashtra #CrimeNews #OnlineFraud #BewareOfImposters

पुणे: पोलीस असल्याचे सांगून तरुणाला २०.२४ लाखांचा गंडा पुणे: पोलीस असल्याचे सांगून तरुणाला २०.२४ लाखांचा गंडा Reviewed by ANN news network on ५/२६/२०२५ ०७:४०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".