बुधवार, २१ मे, २०२५

निगडी येथे गांजाविक्रेता अटकेत 41 हजारांचा गांजा जप्त

 


अजंठानगर येथे एनडीपीएस कारवाई

पुणे, दि. 19 मे 2025: निगडी पोलिसांनी अजंठानगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळून एका व्यक्तीला 820 ग्रॅम गांजासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल विशाल रंगनाथ म्हस्के (बॅज क्र. 2334) यांच्या फिर्यादीनुसार, 19 मे रोजी दुपारी 3:30 वाजता, निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माता रमाबाई आंबेडकर शाळेजवळील सार्वजनिक शौचालय, अजंठानगर येथे पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत सतिश बंडू गायकवाड (58, रा. मौली मंगल कार्यालय, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे, मूळगाव कामगार मैदान, भाजी मंडई जवळ, मुंढवा, पुणे) या व्यक्तीकडून लहान काळ्या प्लास्टिक पिशवीत भरून पाने, फुले, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकिरी रंगाचा ओलसर 820 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे 41,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने हा अंमली पदार्थ अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता विक्रीसाठी बाळगला होता.

आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मचाले करत आहेत.

----------------------------------------------------------------

#DrugBust #NDPS #NigdiPolice #Marijuana #PimpriChinchwad #CrimeControl #PunePolice #IllegalSubstances

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा