"दक्षिण पुण्यात उभारणार 500 खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय"
पुणे - दक्षिण पुण्यातील नागरिकांसाठी मोठी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, बिबवेवाडीतील ईएसआयसीच्या जागेवर सर्व सुपर स्पेशालिटी सुविधांनी युक्त ५०० खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. हे रुग्णालय परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
बिबवेवाडीतील १६ एकर जागेवर सात मजली इमारतीत या रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. सध्या १५० खाटांसह शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध असून, त्यातील १०० खाटा कामगारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या रुग्णालयात अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, सर्व प्रकारच्या सुपरस्पेशालिटी सुविधा तसेच रेडिओलॉजी, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी या प्रयोगशाळा असणार आहेत. कोविड काळात आमदार निधीतून ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.
"काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीत ससून रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालय उभारण्याचे आश्वासन दिले, मात्र ते कधीही पूर्ण केले नाही. आम्ही मात्र केंद्र सरकारच्या मदतीने ते प्रत्यक्षात आणले," असे मिसाळ यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने पुणे महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालयही कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०८:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: