जाधववाडीत विकासकामांची गळचेपी; नागरिकांमध्ये असंतोष
भोसरी (प्रतिनिधी): जाधववाडीतील भूमिपुत्रांच्या जमिनी महापालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या गेल्या असून, उर्वरित जमिनींच्या विकासासाठी शेतकऱ्यांवर होत असलेली दडपशाही आता थांबवली जाईल, असे आश्वासन महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी दिले.
मंगळवारी जाधववाडी येथील प्रचार दौऱ्यात बोलताना गव्हाणे म्हणाले, "मंजूर केलेले रस्ते 'शिफ्ट' करण्यात येत असून, शेतकऱ्यांना जमिनी विकण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड सुप्त संताप आहे."
गेल्या दहा वर्षांत येथील प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक परिवर्तनाच्या मनःस्थितीत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या संधीचा उल्लेख केला.
वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत बोलताना गव्हाणे म्हणाले, "नागरिकरण वाढत असताना सक्षम यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे व वीज वितरण विभागाचे सक्षमीकरण यांना प्राधान्य दिले जाईल."
प्रचार दौऱ्यात सावता माळी मंदिर, वाडा बोल्हाई मळा, जय बजरंग मित्र मंडळ, आहेरवाडी तालीम, सुभाष मित्र मंडळ आदी ठिकाणी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १०:०८:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: