कसबा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना नागरिकांचा पाठिंबा
कसबा : कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार फेरीला शुक्रवार पेठ परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला. या फेरीचे आयोजन भाऊसाहेब रंगारी गणपती, जोगेश्वरी मंदिर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मेट्रो स्टेशन, आंग्रेवाडा, अकरा मारुती चौक, चिंचेची तालीम, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, सुभाषनगर, अत्रे सभागृह या भागात करण्यात आले होते.
प्रचार फेरीत अशोक येनपुरे, रुपाली ठोफ्लबरे पाटील, स्वरदा बापट, उज्ज्वला गंजीवाले, दिलीप काळोखे, सोहम भोसले, दिलीप पवार, अनिल बेलकर, अशोक कदम, प्रणव गंजीवाले, शेखर बोफ्लडकर, पंकज मोने, नंदकुमार जाधव, अनिल पवार, मुकेश राजावत, विजय नाईक, अनिल तेलवडे, राजू ठिगळे, कल्याणी नाईक, अनिता वाघ, इंदिरा निगडे, मयुर गांधी आणि अनेक प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.
हेमंत रासने यांनी आपल्या भाषणात मध्यवस्तीत असलेले बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता यांचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, या रस्त्यांवर असलेल्या ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्य जपण्यासाठी त्याचा आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या परिसरात कोंडी झाली आहे. या अडचणींवर उपाय म्हणून भूमिगत ड्रेनेज आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
रासने पुढे म्हणाले की, मध्यवस्तीत मुख्य बाजारपेठेचा परिसर असल्याने सतत वर्दळ असते. या रस्त्यावर प्रशस्त आणि देखणे पदपथ, पथदिवे आणि रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर बसविण्यात येणार आहेत, ज्यामुळे हा रस्ता पुढील काही वर्षांपर्यंत सुरक्षित आणि सुंदर असेल. नागरिकांसाठी हा रस्ता अधिक सोयीचा आणि आकर्षक करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १०:५२:०० AM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: