विजय कुवळेकर, डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रकाशन
पुणे (प्रतिनिधी): सुप्रसिद्ध गझलकार व कवी राजेंद्र शहा यांच्या 'एकांतस्वर' या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे.
संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कार्यक्रमात राजेंद्र शहा यांच्या गीत-गझलांचा राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेला अल्बमही सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे.
कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गझलकार रमण रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली 'एकांतस्वर' ही कविता-गीत-गझलांची मैफल रंगणार आहे. या मैफलीत प्रदीप निफाडकर, म.भा.चव्हाण, ज्योत्स्ना चांदगुडे, डॉ.संदीप अवचट आणि राजेंद्र शहा सहभागी होणार आहेत.
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा कार्यक्रम शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणेश हॉल, टिळक रोड येथे होणार आहे. स्नेहल दामले कार्यक्रमाचे निवेदन तर धनंजय तडवळकर मैफलीचे सूत्रसंचालन करणार आहेत.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०४:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: