पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख कोटींच्या रस्ते प्रकल्पांची घोषणा
चिंचवड - "चिंचवड विधानसभा निवडणुकीत शंकर जगताप यांना निवडून द्या, तुमच्या सर्व समस्या सोडवण्याची मी वैयक्तिक गॅरंटी देतो," असे ठाम आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
भूमकर चौक, वाकड येथील जाहीर सभेत बोलताना गडकरी यांनी पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली. रावेत ते हडपसर (५००० कोटी), रावेत ते नऱ्हे (४००० कोटी), रावेत ते कात्रज (५००० कोटी) आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर (७००० कोटी) या एलिव्हेटेड मार्गांच्या प्रकल्पांचा समावेश यात आहे.
"जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या वाहतूक समस्येवर हे एलिव्हेटेड रस्ते प्रभावी उपाय ठरतील," असे गडकरी म्हणाले. त्यांनी पुढील पाच वर्षांत पुणे जिल्ह्यात एक लाख कोटींच्या रस्ते प्रकल्पांची घोषणाही केली.
संविधान बदलाच्या मुद्द्यावर बोलताना गडकरी म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही आणि आम्ही तसे होऊ देणार नाही." त्यांनी काँग्रेसवर आणीबाणीच्या काळात संविधान मोडल्याचा आरोपही केला.
सभेला प्रदीपसिंह जडेजा, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, अमित गोरखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शंकर जगताप यांनी मतदारसंघातील विकासकामांचा आराखडा मांडला.
Reviewed by ANN news network
on
११/१६/२०२४ १०:०२:०० PM
Rating:



कोणत्याही टिप्पण्या नाहीत: