दहा वर्षांत भाजपाकडून केवळ घोषणा; काँग्रेसने पूर्ण केली आश्वासने
पिंपरी - "महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार यावे अशी मतदारांची इच्छा आहे," असे प्रतिपादन काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य व कर्नाटकचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी केले.
काळेवाडी, पिंपरी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद सभेत बोलताना जॉर्ज म्हणाले, "भाजपा जाती-धर्माच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करत असून, काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचारांना पुढे नेत आहे."
"मागील दहा वर्षांत भाजपाने केवळ घोषणा करत मतदारांची दिशाभूल केली. उलट काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत," असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश सरचिटणीस बाबू नायर, शहर जिल्हाध्यक्ष कैलास कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस बाबू नायर यांचा सत्कार करण्यात आला.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०८:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: