विकासकामांचा वेग कायम राखण्यासाठी शंकर जगतापांना पाठिंबा
चिंचवड (प्रतिनिधी): स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्यकाळात सुरू झालेला विकासाचा पॅटर्न कायम राखण्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा देण्याचा निर्धार पिंपळे निलख-वाकड ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पिंपळे निलख परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेत महिलांनी जागोजागी जगताप यांचे औक्षण व पुष्पवृष्टी केली.
"स्व. लक्ष्मणभाऊ आणि अश्विनीताई यांच्या आमदार निधीतून पिंपळे निलख परिसरात दोन कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे झाली आहेत," असे शंकर जगताप यांनी सांगितले. यामध्ये तपोवन बौद्ध विहार, पुरोहित समाज सेवा ट्रस्ट येथील कामे, ओपन जिम, वाहतूक बेट, पाणी पुरवठा यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते सचिन साठे, माजी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०५:०९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: