चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना मुस्लिम ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कल संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भोईर यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
कपाट या निवडणूक चिन्हासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भोईर यांच्या प्रचार मोहिमेला वेग आला असून, विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांना अनुसरून मुस्लिम युवक भोईर यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.
या भेटीदरम्यान ऑल इंडिया फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष यासीन शेख यांच्यासह सोहेल शेख, मुशरफ सय्यद, शाहरुख शेख, साजिद कुरेशी, सलमान शेख,अवेज खान, फैजाम शेख, रहीम शेख, शकील शेख व सर्व मित्र परिवार उपस्थित होतेअनेक पदाधिकारी उपस्थित होते. भोईर यांनी मुस्लिम समाजाच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
या पाठिंब्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाऊसाहेब भोईर यांना मुस्लिम समाजाकडून मोठे मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२४ ०१:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: