पिंपरी-चिंचवड : आम आदमी पार्टीने (आप) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील इंडिया फ्रंट आघाडीचे उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्या प्रचारार्थ बर्ड व्हॅली, वाकड येथे मोठा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला.
राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी कार्यकर्त्यांना राहुल कलाटे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. शहराध्यक्षा मीनाताई जावळे यांनी चिंचवड मतदारसंघातील वाढत्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत, घराणेशाहीविरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या इंडिया आघाडीसोबतच्या निर्णयाचे समर्थन करत, भाजपच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील उद्योग, रोजगार आणि सुरक्षेच्या प्रश्नांवर भाष्य केले.
राहुल कलाटे यांनी आप कार्यकर्त्यांचे आभार मानताना, निवडून आल्यानंतर पक्षाप्रति असलेली बांधिलकी व्यक्त केली आणि चिंचवडच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले.
मेळाव्यास आप चे प्रमुख पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. वैजनाथ शिरसाट, सचिन पवार, संतोष इंगळे, स्वप्निल जेवळे यांच्यासह अनेक नेत्यांनी मनोगत व्यक्त केले.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ०४:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: