"पिंपरी गुरुद्वाराच्या लंगरमध्ये शिलवंत यांची सेवा"
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांना शीख समाजाने एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. पिंपरी कॉलनीतील गुरुद्वारात त्यांनी केलेल्या कारसेवेनंतर शीख बांधवांनी हा पाठिंबा व्यक्त केला.
शिलवंत यांनी आपल्या प्रचार फेरीचा प्रारंभ गुरुद्वाराच्या दिवाण हॉलमधील वंदनाने केला. त्यानंतर लंगरमध्ये भाविकांना प्रसाद वाटप करून कारसेवा केली. या वेळी त्यांनी स्वतः देखील लंगरचा प्रसाद स्वीकारला.
शीख बांधवांनी गुरुग्रंथ साहिबमधील स्त्रियांना दिलेल्या महत्त्वाचा उल्लेख करत शिलवंत यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. या प्रसंगी उपस्थित शेकडो शीख बांधवांनी त्यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
समाजातील अनेक प्रमुख व्यक्तींनी शिलवंत यांच्या नेतृत्वाखाली शीख समाज एकजुटीने उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. गुरुद्वारातील या कार्यक्रमाने त्यांच्या प्रचार मोहिमेला सकारात्मक सुरुवात झाली.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १२:३२:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: