पुणे- पुण्यातील प्रतिष्ठित ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी २१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी परवानगी दिली आहे.
१८ ते २२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवासाठी आर्य संगीत प्रसारक मंडळाने केलेल्या विनंतीवरून ही विशेष परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठी ध्वनिक्षेपक वापरासाठी असलेल्या १५ सवलत दिवसांपैकी १३ दिवस यापूर्वीच वापरण्यात आले असून, उर्वरित दोन दिवसांपैकी एक दिवस या महोत्सवासाठी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, ध्वनी प्रदूषण नियम २००० आणि सुधारित नियम २०१७ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. विहित मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवता येणार नाही. तसेच आवश्यक त्या ठिकाणी ध्वनी शोषक सामुग्री लावणे आवश्यक असेल.
क्षेत्रानुसार (झोनिंग) ठरलेल्या मर्यादांचे पालन करावे लागेल आणि शांतता क्षेत्रात ही सूट लागू राहणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०८:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: