कृष्णमूर्ती पद्धत आणि वास्तूशास्त्रावर होणार विचारमंथन
पुणे (प्रतिनिधी): गौरीकैलास ज्योतिष संस्थेतर्फे १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी पुण्यातील हॉटेल प्रेसिडेंट येथे दोन दिवसीय वास्तू ज्योतिष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत आणि वास्तूशास्त्र या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी देशभरातील नामवंत तज्ज्ञ एकत्र येणार आहेत.
संस्थेचे संस्थापक कैलास केंजळे आणि सौ. गौरी केंजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी डॉ. आनंद भारद्वाज (दिल्ली) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून डॉ. त्रिशला शेठ अध्यक्षस्थानी असतील. दुसऱ्या दिवशी श्री. सिल गुरु उद्घाटक तर दत्तप्रसाद चव्हाण अध्यक्षस्थानी असतील.
या संमेलनात भालचंद्र ज्योतिर्विद्यालय, स्मार्ट ऍस्ट्रॉलॉजर्स, ज्योतिष प्रबोधिनी, वास्तू ज्योतिष मित्र, आयादी ज्योतिष आणि वास्तू संस्था, मराठी ज्योतिषी मंडळ या संस्था सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमात विविध ज्योतिषविषयक सत्रे, प्रश्नोत्तरे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्काराने डॉ. सौ. जयश्री बेलसरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हे संमेलन आयोजनाचे हे तिसरे वर्ष असून यंदा अधिक व्यापक स्वरूपात ते साजरे होणार आहे.
Reviewed by ANN news network
on
११/११/२०२४ ०८:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: