"जीएसटी प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊ" - हेमंत रासने
पुणे (प्रतिनिधी): कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पुण्याच्या मध्यवस्तीतील तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, भोवरी आळी परिसरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी पाठिंबा जाहीर केला.
"जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संबंधित सर्व विषयांवर चर्चा करून तातडीने सकारात्मक निर्णय घेतले जातील," असे आश्वासन रासने यांनी दिले.
ते म्हणाले, "पुणे ही राज्यातील प्रमुख बाजारपेठ असून कसबा मतदारसंघात सर्वाधिक बाजारपेठा आहेत. व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणार."
व्यापारी पेठांमधील पार्किंगच्या समस्येवर बोलताना त्यांनी सांगितले की, उपलब्ध जागांवर विस्तारित पार्किंग उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणेची व्याप्ती वाढवली जाणार आहे.
कार्यक्रमाला राजेंद्र काकडे, नितीन पंडित, उमेश शहा यांच्यासह अनेक व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०८:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: