मराठा समाजाच्या प्रगतीसाठी माहितीपुस्तिकेचे प्रकाशन
मुंबई (प्रतिनिधी): महायुती सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणाऱ्या 'मराठा समाज टाका पाऊल प्रगतीचे' या पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवारी करण्यात आले. समाजात संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरेल, असा विश्वास भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण लागू केल्यामुळे अनेक तरुणांना शिक्षण व प्रशासकीय सेवेत लाभ मिळाला."
"2018 ते 2021 या आरक्षण कालावधीत आणि 2024 मध्ये सुमारे आठ हजार मराठा उमेदवारांना शासकीय व निमशासकीय सेवेत नोकऱ्या मिळाल्या. 2024 च्या पोलीस भरतीत एसईबीसीमधून 867 जणांची निवड झाली," असे त्यांनी सांगितले.
आरक्षणास स्थगिती आल्यानंतर निवड झालेल्या परंतु नियुक्ती न मिळालेल्या 3700 वंचित उमेदवारांना अधिसंख्य पदांच्या माध्यमातून सामावून घेण्यात आल्याचीही माहिती दरेकर यांनी दिली.
पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०९:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: