आंबील ओढा परिसरात सीमाभिंतींची कामे होणार
पुणे (प्रतिनिधी): पर्वती विधानसभा मतदारसंघातील आंबील ओढा परिसरासह नाल्यांच्या बाजूला असलेल्या रहिवासी वस्तीतील पूरस्थिती रोखण्यासाठी 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
बिबवेवाडी परिसरातील प्रचारफेरीत बोलताना त्या म्हणाल्या, "पाच वर्षांपूर्वी कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने आंबील ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे जलवाहिन्या, ड्रेनेज लाईन आणि सीमाभिंती खराब झाल्या होत्या."
केंद्र शासनाने शहरी पूर व्यवस्थापनासाठी महापालिकेला 350 कोटींचा निधी देणार असून, या निधीतूनही मतदारसंघात विकासकामे केली जाणार आहेत.
निर्मल पार्क ते बागूल उद्यान (5 कोटी), पश्चिमनगर ते सेंट झेविअर्स शाळा (3 कोटी), खोराडा वस्ती (3 कोटी) आदी 13 ठिकाणी सीमाभिंतींची कामे होणार आहेत.
कार्यक्रमाला वर्षा साठे, रूपाली धाडवे, भीमराव साठे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या ठिकाणी होणार कामे
- निर्मल पार्क ते बागूल उद्यान सीमाभिंत पाच कोटी
- पश्चिमनगर ते सेंट झेविअर्स शाळा सीमाभिंत तीन कोटी
- खोराडा वस्ती सिंहगड रस्ता सीमाभिंत तीन कोटी
- गजानन महाराज मठामागील बाजूस सीमाभिंत तीन कोटी
- विठ्ठलनगर सिंहगड रस्ता परिसरात सीमाभिंत पाच कोटी
- मंदार सोसायटी ते चंद्रशेखर मार्ग सीमाभिंत तीन कोटी
- सावित्रीबाई नगर सिंहगडरस्ता सिमाभिंत दोन कोटी
- ईएसआयसी हॉस्पिटल ते तिरंगा हॉटेल सीमाभिंत दोन कोटी
- कटारिया हायस्कूल ते कॅनॉल सीमाभिंत पाच कोटी
- मार्केट यार्ड, मुकुंदनगर, महर्षीनगर सीमाभिंत दोन कोटी
- हिंगणे परिसर ओढ्यालगत सीमाभिंत दोन कोटी
- गुरुराज सोसायटी सीमाभिंत पाच कोटी
- के.के. मार्केट ते गुरुराज सोसायटी बिबवेवाडी उर्वरित भागात सीमाभिंत पाच कोटी
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०८:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: