‘शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले’, असे उपस्थित युवतींचे मत !
मंचर (जिल्हा पुणे) सध्याच्या काळात हिंदु महिलांची वाढती असुरक्षितता, हिंदु युवतींवर होणारी प्राणघातक आक्रमणे, हिंदु युवकांवर होणारी जीवघेणी आक्रमणे आदींचा विचार करता हिंदु युवक युवतींना स्वतःचे रक्षण करता येणे ही काळाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतात. मंचर (लोंढेमळा) येथे 5 ऑक्टोंबर या दिवशी नव्याने महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला. वर्गाला 25 तरुणींची उपस्थिती होती. प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यासाठी निवृत्त पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. प्रकाश लोंढे, भाजप किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संजय शेठ थोरात, प्रखर धर्माभिमानी श्री तुकाराम शेठ लोंढे आणि श्री. अरूण शेठ लोंढे यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले. प्रशिक्षण वर्गाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी श्री. प्रकाश लोंढे यांनी सर्वधर्मसमभावाची निरर्थकता स्पष्ट केली.
श्री. संजय शेठ थोरात यांनी महिलांची सद्यस्थिती सर्वांसमोर मांडली. हिंदू जनजागृती समितीचे श्री. विजय चौधरी यांनी प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता उपस्थितांना स्पष्ट केली. प्रशिक्षण वर्गाचा लाभ संपर्कातील अधिकाधिक हिंदूंना व्हावा, यासाठी श्री तुकाराम शेठ लोंढे यांनी तळमळीने प्रयत्न केले.
काही पुरुष आपल्या पत्नीलाही वर्गाला घेऊन आले होते. प्रशिक्षण वर्गाला सर्व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. या प्रसंगी स्वरक्षणाच्या पद्धती शिकवण्यात आल्या. ‘शिबिराच्या माध्यमातून स्वरक्षणाचे महत्त्व लक्षात आले’, असे उपस्थित युवतींनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: