मुंबई : महाराष्ट्र शासनाने एका महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णयात अनेक अवर सचिवांच्या नियुक्त्यांमध्ये बदल केला आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या आदेशात सध्या मुख्यमंत्री कार्यालयात आणि इतर महत्त्वाच्या पदांवर प्रतिनियुक्तीवर असलेल्या पाच अधिकाऱ्यांना अन्यत्र बदलले आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे अवससचिवर ग. स. परब यांनी जारी केलेल्या या आदेशान्वये, मुख्यमंत्री कार्यालयातील खालील अधिकाऱ्यांना अन्यत्र बदलण्यात आले आहे.
१. श्री सुधीर पंडितराव शास्त्री, सध्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत, यांची नगर विकास विभागात बदली करण्यात आली आहे.
२. श्री धीरज कांतीलाल अभंग, हे देखील मुख्यमंत्री कार्यालयातून गृहनिर्माण विभागात रुजू होणार आहेत.
३. श्री निलेश उद्धव पोतदार यांची मुख्यमंत्री कार्यालयातून पर्यावरण व वातावरणीय बदल विभागात बदली करण्यात आली असून, ते तेथे शास्त्रज्ञ श्रेणी-२ या पदावर काम करतील.
४. श्री प्रविण महावीर पाटील यांची नवीन नियुक्ती महसूल व वन विभागात करण्यात आली आहे.
५. श्रीमती वृषाली सचिन चवाथे यांची मुख्यमंत्री कार्यालयातून वित्त विभागात बदली करण्यात आली आहे.
या अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवा प्रत्यावर्तित केल्यानंतर त्वरित नव्या विभागात रुजू व्हावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: