पुणे : लोकसभेचे विरोधीपक्ष नेता राहुल गांधी यांना महाराष्ट्रातील दोन न्यायालयांनी न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. पुणे आणि नाशिक येथील न्यायालयाने हे समन्स काढले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतीत राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा हा परिपाक आहे.
राहुल यांना २३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे तर २७ ऑक्टोबर रोजी नाशिकच्या न्यायालयात हजर रहावे लागणार आहे. ५ मार्च २०२३ रोजी राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सावरकरांचे वंशज सात्यकी सावरकर यांनी राहुलगांधींवर मानहानीचा खटला दाखल केला असून राहुल गांधी सतत सावरकरांच्या प्रतिमेला हानी पोहचवत आहेत आणि 'सावरकर' आडनावाच्या प्रतिमेला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत असे सात्यकी यांनी आपल्या खटल्यात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: