मुंबई :- मुंबईतील पाच मुख्य प्रवेश मार्गांवरील हलक्या वाहनांसाठी पथकर (टोल) माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आज रात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईत येणाऱ्या लाखो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे,
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत झाली या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.ते पुढीलप्रमाणे...
आगरी समाजासाठी महामंडळाची स्थापना
राज्यातील आगरी समाजाच्या विकासासाठी खास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या महामंडळाच्या स्थापनेमुळे आगरी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांमार्फत या समाजातील लोकांना मदत केली जाणार आहे
समाजकार्य महाविद्यालयातील अध्यापकांना प्रगतीची संधी
समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांसाठी करिअर ॲडव्हान्समेंट स्किम लागू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या स्किममुळे अध्यापकांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगतीची संधी मिळेल. तंत्रशिक्षण विभागाने ही योजना पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करणार असल्याचे सांगितले आहे.
जलसंपदेत सुधारणा: दोन महत्त्वाच्या योजनांना मंजुरी
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजना आणि आष्टी उपसा सिंचन योजना या दोन महत्त्वाच्या योजनांना मंत्रिमंडळाने सुधारित मान्यता दिली आहे. या योजनांमुळे संबंधित भागांतील शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
अन्य महत्त्वाचे निर्णय
राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील कामांना मान्यता दिली आहे. किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज माफ करण्यात आले आहे, तसेच अडचणीत असलेल्या सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्जही माफ करण्यात आले आहे.
(सविस्तर निर्णय लवकरच अपडेट केले जातील)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: