पुणे : पुणे विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे! रेल्वेने गाडी क्रमांक १२७८०/१२७७९ निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्स्प्रेसला किर्लोस्करवाडी आणि २२६८५/२२६८६ यशवंतपूर-चंदीगड कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेसला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या बदलामुळे पुणे विभागातील प्रवाशांना या गाड्यांचा अधिक सोयीस्करपणे वापर करता येईल.
तपशील खालीलप्रमाणे:-
* १२७८० निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस: JCO 08.10.2024 पासून किर्लोस्करवाडी येथे 21.13 वाजता पोहोचेल आणि 21.14 वाजता सुटेल.
* १२७७९ वास्को द गामा-निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस: JCO 09.10.2024 पासून किर्लोस्करवाडी येथे 23.23 वाजता पोहोचेल आणि 23.24 वाजता सुटेल.
* २२६८५ यशवंतपूर-चंदीगड कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस: JCO 09.10.2024 पासून सांगलीला 03.32 वाजता पोहोचेल आणि 03.34 वाजता सुटेल.
* २२६८६ चंदीगड- यशवंतपूर कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस: JCO 08.10.2024 पासून सांगलीला 15.52 वाजता पोहोचेल आणि 15.54 वाजता सुटेल.
प्रवाशांनी नोंद घ्यावी व या नवीन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: