पिंपरी: पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) मधील कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळवून देण्यासाठी आ. अमित गोरखे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. २०२२ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता, परंतु कामगारांना ६८ महिन्यांचा फरक देण्याचे काम अजून बाकी होते.
या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता की, फरकाची रक्कम चार टप्प्यांत दिली जाईल. यासाठी पीएमपीएमएल कामगारांनी आणि कामगार संघटनांनी सातत्याने आमदार महोदयांकडे मागणी केली होती.
आ. अमित गोरखे यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही संस्थांशी संपर्क साधून, सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम दसर्यापूर्वी पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने ₹८४.१५ कोटी (६०% स्वामित्वानुसार) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ₹५६.१० कोटी (४०% स्वामित्वानुसार) निधी पीएमपीएमएलला त्वरित वर्ग केला.
फरकाची रक्कम लवकरच वितरित केली जाणार:
या निर्णयामुळे पुणे परिवहन महामंडळातील सर्व ११,००० कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. फरकाची रक्कम लवकरच वितरित केली जाईल, आणि या प्रयत्नांमुळे पीएमपीएमएल कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कामगारांनी आणि कामगार संघटनांनी आ. अमित गोरखे यांचे आभार मानले आहेत.
आ. अमित गोरखे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची भावना आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: