पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (YIMS) मध्ये आज 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत संस्थेच्या एमबीए आणि एमसीए विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
महाविद्यालयाजवळील महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात YIMS चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "पर्यावरणाचे संतुलन आणि सुदृढ मानवी आरोग्यासाठी सर्वांनी स्वच्छतेच्या सवयींचा अंगीकार करायला हवा," असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुष्पराज वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. गंगाधर डुकरे यांनी केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. संस्थेच्या प्राध्यापक वर्गानेही या मोहिमेत सहभाग घेतला.
Reviewed by ANN news network
on
१०/०३/२०२४ ०८:१५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: