उरण : काँग्रेस पक्षाने रायगड जिल्ह्यात पर्यावरण विभागासाठी दोन महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. जितेश दत्ताराम म्हात्रे यांची रायगड जिल्हा पर्यावरण विभागाच्या सरचिटणीसपदी, तर गुफरान सईद तुंगेकर यांची उरण शहर पर्यावरण विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्या काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आल्या. या कार्यक्रमाला जेष्ठ नेते नंदराज मुंगाजी, पर्यावरण विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष राजीव पाटील, पर्यावरण विभाग उरण तालुका अध्यक्ष अंगत ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी या संधीचे स्वागत करताना पक्षाच्या ध्येय धोरणांचा प्रसार करण्याचा आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करण्याचा निश्चय व्यक्त केला.
या नियुक्त्यांमुळे काँग्रेस पक्षाचा तळागाळातील प्रचार आणि प्रसार वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, पर्यावरण संरक्षणासाठी अधिक प्रभावी कार्य होईल अशी आशा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केली आहे.
गुफरान तुंगेकर आणि जितेश म्हात्रे या दोघांनाही पक्षाचे कट्टर एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षाच्या पर्यावरण विभागाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: