अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची उधळण

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरुवात झाली आहे. या यात्रेत पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनीही सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, यात्रेत गुलाबी रंगाची वाहने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या गुलाबी वाहनांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना आणि इतर शासकीय योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे.

महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी गुलाबी रंग वापरण्यात आला आहे. यात्रेत सहभागी होणारे मंत्री आणि पदाधिकारी गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करत आहेत. या माध्यमातून अधिवेशनात जाहीर केलेल्या योजनांची जास्तीजास्त प्रसिध्दी करण्याचा प्रयत्न होत आहे.

यात्रेत शासकीय वाहनांसह २०० हून अधिक वाहनांचा ताफा आहे, ज्यामध्ये दोन-तीन व्हॅनिटी वाहने आणि काही छोटी वाहने गुलाबी रंगाची आहेत. या वाहनांमध्ये एलईडी पडद्याची सुविधा आहे, ज्याद्वारे योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

अजित पवार यांनी आपल्या पोषाखात केलेला बदल आणि जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केल्यामुळे ही यात्रा अधिक चर्चेत आली आहे.

अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची उधळण  अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची उधळण Reviewed by ANN news network on ८/०८/२०२४ ०४:४६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".