विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी भाजपा महिला मोर्चाचे पोलीस आयुक्तांना निवेदन

 


पुणे: शहरात आणि राज्यात अलीकडे घडलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंग प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी (भाजपा) पुणे शहर महिला मोर्चाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. या भेटीत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या.

भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्यांचा समावेश होता:

१. शहरातील सर्व शाळा प्रशासनांची तातडीने बैठक घेऊन विद्यार्थी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सूचना देणे.

२. सर्व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलीस सत्यापन आणि चारित्र्य पडताळणी करणे.

३. शाळांमधील सीसीटीव्ही यंत्रणेचे ऑडिट करणे.

४. प्रत्येक शाळेत पूर्णवेळ महिला पोलीस कर्मचारी नियुक्त करणे.

५. दामिनी पथकाचा प्रभावी वापर करून अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना करणे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

याशिवाय, भाजपा पुणे शहर संघटनेतर्फे विद्यार्थी आणि पालकांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी शहरस्तरीय कार्यक्रमात शाळा संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक सहभागी होणार असून पोलीस आयुक्त मार्गदर्शन करणार आहेत.

या शिष्टमंडळात भाजपा पुणे शहराध्यक्ष  धीरज घाटे व महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे यांच्यासहशहर सरचिटणीस वर्षा तापकीर, पुनीत जोशी, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, महिला मोर्चा सरचिटणीस शामा जाधव, उज्वला गौड, गायत्री खडके, प्रियांका शेंडगे, स्वाती मोहोळ, खुशी लाटे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.


विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी भाजपा महिला मोर्चाचे पोलीस आयुक्तांना निवेदन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी भाजपा महिला मोर्चाचे पोलीस आयुक्तांना निवेदन Reviewed by ANN news network on ८/२३/२०२४ ०१:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".