पिंपरी : क्रांतिकारकांच्या बलिदानाचा, त्यांच्या असीम त्यागाचा आणि तेजस्वी शौर्याचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर आणून त्यांच्या मनात प्रखर राष्ट्रप्रेम आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान वृद्धिंगत व्हावा या उदात्त हेतूने महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने या महिन्यात पिंपरी चिंचवड येथील अनेक शाळांमध्ये क्रांतिगाथा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्दिष्ट:
सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये देशप्रेम आणि देशाभिमान या गोष्टी शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. हे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत आहे, अशी प्रतिक्रिया अनेक शाळा प्रमुखांनी आणि शिक्षकांनी व्यक्त केली. त्यांनी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
सहभागी शाळा:
युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचवड, राजीव गांधी विद्यालय नेहरूनगर, वल्लभनगर, क्रीडा प्रबोधिनी विद्यालय, उद्यम नगर, नेहरूनगर, वल्लभनगर, माटे शाळा तानाजी नगर चिंचवड, लक्ष्मी बाई बारणे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल चिंचवड अशा एकूण ६ शाळांमध्ये हे क्रांतिकारक फ्लेक्स प्रदर्शन आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ १ सहस्राहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.
शिक्षकांची प्रतिक्रिया:
शाळेतील शिक्षकांनी सांगितले की, क्रांतिकारकांविषयी नुसते ऐकून मुलांच्या लक्षात राहत नाही, मात्र त्यांची चित्रे आणि माहिती असल्याने क्रांतिकारक मुलांच्या चांगले लक्षात राहतील. शाळेतील मुलांना बऱ्याचश्या क्रांतिकारकांविषयी माहिती नसते, या प्रदर्शनातून मुलांना ही माहिती मिळाली असून हा उपक्रम खूप छान आहे.
राष्ट्रध्वजाचा मान राखा:
या प्रदर्शनाच्या वेळी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ याविषयीचे निवेदनही देण्यात आले.
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२४ ०४:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: