जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले

 


पुणे : कावेरीनगर क्रीडा संकुल, वाकड येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी एकूण १० सुवर्णपदके, १ रौप्यपदक आणि ४ कांस्यपदके जिंकली आहेत.

१९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये, वेदांत गव्हाणे (५५ किलो), वैभव ठाकूर (६० किलो), प्रतीक धिमधीमे (६६ किलो) आणि सुशील ठवरे (५५ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. तर ओम जाधव (६६ किलो) याने कांस्यपदक जिंकले.

१७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये, साहिल पाथरट (६० किलो), ज्योतिरादित्य मुळे (६६ किलो) आणि सुरज कविटकर (७३ किलो) यांनी सुवर्णपदक मिळवले. किटे सार्थक (५५ किलो) याने रौप्यपदक तर आर्य गव्हाणे (६६ किलो) याने कांस्यपदक जिंकले.

१९ वर्षे वयोगटातील मुलींमध्ये, ऋतुजा मार्के (४८ किलो), अनुराधा फुगे (६३ किलो) आणि ज्ञानेश्वरी हाके (७० किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले. तर आदिती दौंडकर (५७ किलो) आणि आदिती कडूसकर (७० किलो) यांनी कांस्यपदक जिंकले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या १० खेळाडूंची शालेय विभागस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी मार्गदर्शन केले.

या यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरीचे माजी आमदार  विलास  लांडे यांनी विशेष अभिनंदन केले आणि त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार    अजित  गव्हाणे,  सचिव  सुधीर मुंगसे, विश्वस्त विक्रांत लांडे, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस, सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाने आपले क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व सिद्ध केले असून, येत्या विभागीय स्पर्धेतही महाविद्यालयाच्या खेळाडूंकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले Reviewed by ANN news network on ८/२६/२०२४ ०९:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".