शिरूर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा;अश्लील चाळे करताना आढळली विद्यार्थ्यांची युगुले! चालकावर गुन्हा दाखल
शिरूर : शिरूर येथील १० ईलेव्हन कॅफेमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अश्लील वर्तन करण्यासाठी मुभा देण्यात आल्याची माहिती मिळाल्याने शिरूर पोलिसांनी कारवाई करत कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. साध्या वेशात ग्राहक म्हणून गेलेल्या पोलिसांनी या कॅफेवर छापा टाकला.
कॅफेचे चालक सौरभ शिवाजी पवार (वय २२ वर्षे, रा. सिद्धार्थ नगर, शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई निलेश दत्तात्रय थोरात यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
शिरूर शहरातील अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेना आपले गाळे भाड्याने देत आहेत. या कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून विद्यार्थ्यांना अश्लील वर्तनासाठी ठिकाण उपलब्ध करून देण्यात आले होते. अशा गाळे मालकांवरही पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर शहरातील वेगवेगळ्या कॅफे चालकांनी त्यांच्या कॅफे हॉटेलमध्ये अवैध पार्टीशन केल्याने शालेय आणि महाविद्यालयीन मुले-मुली असभ्य आणि अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस शिपाई निलेश थोरात, पोलीस हवालदार अरुण उबाळे, निलेश शिंदे, रघुनाथ हाळनोर, महिला पोलीस शिपाई रेश्मा पळसकर यांनी साध्या वेशात १० ईलेव्हन कॅफेमध्ये जाऊन कारवाई केली.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरुण उबाळे करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/२६/२०२४ ०२:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: