पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील किवळे भागात २६ जुलै रोजी एका १६ वर्षांच्या मुलाने ब्ल्यू व्हेल गेम खेळण्याच्या नादात इमारतीच्या १४ व्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरातून खाली उडी मारून आत्महत्या केली आहे.
आर्य श्रीराव असे या मुलाचे नाव आहे. हा मुलगा इयत्ता १० वीत शिकत होता. अलिकडे त्याला ब्ल्यू व्हेल हा ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. तो तासनतास हा गेम खेळत असे. दोनदोन दिवस खोलीत बंद राहून गेम खेळत असे.अलिकडे त्याचा स्वभाव चिडखोर बनला होता.
त्याचे वडील नोकरी निमित्त परदेशात राहतात घरात त्याची आई, तो आणि त्याचा धाकटा भाऊ असे तिघेच रहात होते.आत्महत्येपूर्वी त्या मुलाने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात त्यात लिहिले आहे की, लॉग ऑफ करा, मी नोकरी सोडली आहे, मी सुसाईड नोट लिहू शकत नाही.
याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: