पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीच्या टोळ्यांवर मोठी कारवाई केली आहे. मोका कायद्याच्या अंतर्गत पगार, दळवी आणि काळे टोळी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
२०२४ मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी कार्यक्षेत्रातील २५ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकूण १४८ आरोपींवर मोका कायद्यानुसार कारवाई केली आहे.
कारवाई करण्यात आलेल्या टोळ्यांची माहिती पुढीलप्रमाणे
हिंजवडी पोलीस ठाणे:
सचिन साहेबराव पगार (टोळी प्रमुख) वय ३१, दीपक भगवान जाधव वय २६, योगेश शिवाजी दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर एकूण १० गुन्ह्यांची नोंद आहे.
भोसरी पोलीस ठाणे:
ओमकार मल्हारी दळवी (टोळी प्रमुख) वय २२, योगेश जगन्नाथ मुळे वय २१, गणेश कृष्णा गवारी वय १९, विजय विरेंद्र चव्हाण वय १९, सचिन ऊर्फ पिरप्पा जगन्नाथ येरे वय २०, तेजस चंद्रकांत डोंगरे वय २२ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर एकूण ०७ गुन्ह्यांची नोंद आहे.
पिंपरी पोलीस ठाणे:
सुप्रिम राजू काळे (टोळी प्रमुख) वय २४, अविनाश सुभाष पात्रे वय १९, विनायक दयानंद क्षिरसागर वय २०, सुरेश काटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर एकूण ०७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
या तीन प्रमुख टोळ्या हिंसाचाराचा वापर करून, आर्थिक फायद्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारी करत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: