मुलीच्या घरी वाईट वागणूक मिळत असलेल्या वृद्धाची समाजकल्याण विभागाने केली सुटका

 


पुणे : तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनीत राहणाऱ्या समस्याग्रस्त ८० वर्षीच ज्येष्ठ नागरिकाची समाज कल्याण विभागाच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी भेट देवून सुटका केली. सुटका केल्यानंतर त्यांना  वृद्धाश्रमात पाठविण्यात येणार आहे.

सांची इंटिग्रेशन असोसिएशन पुणे या संस्थेने तळेगाव दाभाडे येथे राहणाऱ्या गंगाधर कडाळी यांना नातेवाईकांडून वाईट वागणूक दिली जात असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाला दिली. माहिती मिळाल्यावर सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी एन.एस. मकवाना आणि सीमा पांचाळ यांना माहिती घेण्यासाठी कडाळी यांच्याकडे पाठविले.

ज्येष्ठ नागरिक श्री.कडाळी हे  त्यांच्या मुलीच्या घरी रहात होते. समाज कल्याण विभागाच्या पथकाने घरी भेट दिली असता टेरेसवर अनारोग्यदायी वातारणात पलंगावर ते बसलेले आढळले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झालेली होती.  पथकाने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी होणारा त्रास सांगतांना वृद्धाश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली.

सांची इंटिग्रेशन असोसिशनचे डी.आर.परिहार, श्री.मकवाना आणि श्रीमती पांचाळ यांनी  श्री.कडाळी यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांची प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याची व्यवस्था समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शासकीय वसतीगृहाच्या अधीक्षकांनी दिली आहे.

नागरिकांनी वृद्ध व्यक्तींची योग्यप्रकारे काळती घ्यावी. योग्यप्रकारे  काळजी न घेतल्यास ज्येष्ठ नागरिक व आईवडील यांचे चरितार्थ अधिनियम २००७ नियम २०१० नुसार संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल आणि समाज कल्याण विभागातर्फे निर्वाह भत्ता वसूल करण्यात येईल असेही कळविण्यात आले आहे.


मुलीच्या घरी वाईट वागणूक मिळत असलेल्या वृद्धाची समाजकल्याण विभागाने केली सुटका मुलीच्या घरी वाईट वागणूक मिळत असलेल्या वृद्धाची समाजकल्याण विभागाने केली सुटका Reviewed by ANN news network on ७/०३/२०२४ ०९:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".