पुणे : अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांची उपस्थिती राहिली. १८ जुलै रोजी पुणे येथे आयोजित या बैठकीत शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २८ जणांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर झालेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
अजित पवार यांच्या बैठकीत पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, श्याम लांडे, शमीम पठाण, संतोष कोकणे, राजेंद्र जगताप, माया बारणे, मयूर कलाटे, अतुल शितोळे, डब्बु आसवाणी, राजू मिसाळ, प्रसाद शेट्टी, मनोज खानोलकर, उषा काळे, स्वाती काटे, कैलास बारणे, नारायण बहिरवडे, सतीश दरेकर, आशा सुर्यवंशी, सुजित पाटील, मंदा आल्हाट, रोहित काटे, राजू लोखंडे, महमद पानसरे, कळुराम पवार, अमिना पानसरे, वैशाली काळभोर, मंगला कदम, अपर्णा डोके, सुषमा तनपुरे, सारिका पवार, गोरक्ष लोखंडे, मायला खत्री, संदीप पवार, श्याम जगताप आणि इतर नेते उपस्थित होते.
या बैठकीत नवीन शहराध्यक्ष निवडीचा निर्णय होईल असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, या विषयावर कोणताही निर्णय जाहीर झाला नाही. माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवार यांच्या बैठकीत उपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, कारण अजित गव्हाणे यांनी माध्यमांशी बोलताना लांडे यांचा आपल्या भूमिकेला लांडे यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते.
पिंपरी चिंचवड शहरात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे चर्चांना उधाण आले आहे. पुढील काही दिवसांत या स्थितीत आणखी काही बदल होतील अशी शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: