.
नवी दिल्ली : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्यानंतर थेट मंत्रिपद मिळणार असल्याने मोहोळ हे भाग्यशाली ठरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ९ जून रोजी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर अन्य काही खासदारही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याम्य्ळे ज्यांचा आज मंत्रिमंडळात समावेश होणार आहे त्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून कॉल केले जात आहेत.
महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ,रक्षा खडसे , रामदास आठवले यांना कॉल आले असल्याची माहिती आहे.
शिवसेना शिंदेगटातून कोणाची वर्णी लागणार हे अद्याप ठरलेले नाही. तीनवेळा निवडून आल्यामुळे श्रीकांत शिंदे यांची वर्णी मंत्रिपदी लागणार अशी शक्यता होती.मात्र, घराणेशाहीचा आरोप झाला तर काय करायचे या संभ्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडकले आहेत. तर प्रतापराव जाधव शिंदे यांच्या भेटीला गेले असून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सुनील तटकरेही मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे नेमकी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही.
यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता
दरम्यान,अमित शहा,राजनाथ सिंह,नितीन गडकरी,ज्योतिरादित्य सिंधिया,शिवराज सिंह चौहान,पियूष गोयल, रक्षा खडसे, जितेंद्र सिंह,राव इंद्रजीत सिंह, मनोहरलाल खट्टर, मनसुख मंडाविया, अश्विनी वैष्णव, शंतनु ठाकूर, जी. किशन रेड्डी, हरदीपसिंग पुरी, बंडी संजय, बी. एल. वर्मा, किरेन रिजिजू, अर्जुनराम मेघवाल, रवनीतसिंह बिट्टू, सर्वानंद सोनोवाल,शोभा करंदलाजे, श्रीपाद नाईक, प्रल्हाद जोशी, निर्मला सीतारमण, नित्यानंद राय, कृष्णपाल गुर्जर, सी आर पाटील, पंकज चौधरी, सुरेश गोपी, सावित्री ठाकूर,
गिरीराज सिंह, गजेंद्रसिंह शेखावत, मुरलीधर मोहोळ, अजय टमटा, धर्मेंद्र प्रधान, हर्ष मल्होत्रा (सर्व भाजप), प्रतापराव जाधव (शिंदेसेना),रामनाथ ठाकूर (जेडीयू), ललन सिंह (जेडीयू), मोहन नायडू (टिडीपी), पी. चंद्रशेखर पेम्मासानी (टिडीपी),चिराग पासवान (एलजेपी), जीतनराम मांझी (हिंदुस्थानी अवाम मोर्चा),जयंत चौधरी (आरएलडी),अनुप्रिया पटेल (अपना दल-एस),
चंदप्रकाश (आजसू),एच. डी. कुमारस्वामी (जेडीएस),रामदास आठवले (आरपीआय) यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: