एसटी बस झाडावर आदळली; ३० प्रवासी जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील यवत जवळ पुणे सोलापूर मार्गावर  पंढरपूर ते मुंबई बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारील झाडावर आदळली. या अपघातात बसमधील ३० प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

यवत जवळ असलेल्या सहजपूर गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस यांनी घटनास्थाळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना लोणी काळभेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

एसटी बस झाडावर आदळली; ३० प्रवासी जखमी एसटी बस झाडावर आदळली; ३० प्रवासी जखमी Reviewed by ANN news network on ६/२४/२०२४ १२:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".