पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या खांडशी या गावच्या तलाठ्याला अँटी करप्शन खात्याच्या पथकाने 25 जून रोजी दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
अंकुश रामचंद्र साठे असे या तलाठ्याचे नाव आहे याप्रकरणी एका शेतकऱ्याने अँटी करप्शन खात्याकडे तक्रार दिली होती.
त्या शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर असलेली गिनी गवताची नोंद दुरुस्त करून सुधारित सातबारा देण्यासाठी तलाठी साठे यांनी त्या शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. या शेतकऱ्याने अँटी करप्शन खात्याकडे तक्रार दिल्यानंतर खात्याच्या पथकाने पडताळणी केली त्यामध्ये साठे यांनी दहा हजार रुपये लाच मागितल्याचे दिसून आले. सापळा रचून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना साठे यांना अँटी करप्शन खात्याच्या पथकाने पकडले.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे येथे 213/2024 या क्रमांकाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अँटी करप्शन विभागाने केली.
Reviewed by ANN news network
on
६/२६/२०२४ ०८:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: