महाराष्ट्र जनता दलात आनंदाचे वातावरण
पुणे : जनता दल सेक्युलर पक्षाचे ज्येष्ठ नेते व कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांची केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी आज(रविवारी) त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी पक्षाचे प्रधान महासचिव अजमल खान,विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एड.संग्राम शेवाळे उपस्थित होते.लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे एच.डी. कुमारस्वामी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
नाथाभाऊ शेवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे.'केंद्रीय मंत्रीपदावर एच.डी. कुमारस्वामी यांची निवड झाल्याने पक्षात आनंदाचे वातावरण असून महाराष्ट्रातील जनता दल सेक्युलर पक्षाच्या कार्यकर्त्यांना,पदाधिकाऱ्यांना मोठे बळ मिळणार आहे.लवकरच कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत पक्षाचे महाराष्ट्रात पक्षाचे अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे ',असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.
Reviewed by ANN news network
on
६/०९/२०२४ ०९:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: