मुंबई : काही कालावधीपूर्वी मंबईतील घाटकोपर येथे रेल्वेच्या जागेत असलेले होर्डिंग कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (मानवाधिकार संरक्षण) कैसर खालिद यांना राज्यशासनाने निलंबित केले आहे.
खालिद रेल्वे पोलीस कमिशनर असताना त्यांनी या होर्डिंगला महासंचालक कार्यालयाची मंजुरी न घेता परवानगी दिली होती.शासनाचे निकष बाजूस सारून 120 x 140 चौरस फूट आकाराचे हे होर्डिंग उभारण्यास खालिद यांनी परवानगी दिली होती.
खालिद यांच्या पत्नीच्या कंपनीच्या खात्यात होर्डिंग उभारणार्या कंपनीने मोठी रक्कम भरल्याचे दिसून आले होते.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक कैसर खालिद निलंबित
Reviewed by ANN news network
on
६/२६/२०२४ १२:२३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/२६/२०२४ १२:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: