दिलीप शिंदे
सोयगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमित्त समाजच्या सेवेसाठी आयुष्य अर्पण केलेले जामनेर तालुक्यातील युवकांचे आदर्श बनलेल्या व आजवर हजारो झाडे लावलेल्या कीन्ही येथील राहुलराॅय पाटील मुळे यांचे वतीने पहुर पेठ येथे वृक्षारोपण करण्यात आले.
निम, जांभूळ, करंज, पिंपळ या देशी व तापमान कमी करणाऱ्या, कार्बन वायू शोषून घेणाऱ्या वृक्षांचे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील चिंचोले ,किरण खैरनार, किशोर बारी, सुपरस्टार विजय बनकर, पंकज प्रजापती,ईमरान शेख, नितीन कुंभार, गजेंद्र प्रजापती,दिपक भोई, नामदेव बारी,बंटी शिंपी,सोनु थोरात, स्वप्निल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रोपण करून सर्व रोपांची संगोपनाची जबाबदारी ही पहुरकरांनी स्वीकारली याबद्दल समाजसेवक राहुल रॉय मुळे यांनी पहुरकरांचे आभार मानले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त पहुर येथे वृक्षारोपण
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२४ ०२:४२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: