पुणे : जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होत आहे. मावळ लोकसभा निवडणूक मतदानाच्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे १२ मे रोजी सकाळी ८ वाजता विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.
पनवेल विधानसभा मतदासंघाकरीता ए. आर. कासेकर पॉलिटेक्नीक कॉलेज, ठाणा नाका रस्त्याजवळ, कर्नाळा स्पोर्टस् ॲकेडेमीच्या समोर, पनवेल जि. रायगड, कर्जत विधानसभा मतदारसंघाकरीता पोलीस मैदान, प्रशासकीय इमारतीजवळ, कर्जत, उरण विधानसभा मतदारसंघाकरीता डी.बी. पाटील मंगल कार्यालय, जसई, ता. उरण, जि. रायगड, मावळ विधानसभा मतदारसंघाकरीता नूतन अभियांत्रिकी कॉलेज, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, चिंचवड विधानसभा मतदारसंघाकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ, स्वर्गीय शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाकरीता ऑटो क्लस्टर आणि रिसर्च सेंटर, चिंचवड येथून साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंगला यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: