नैराश्याने ग्रासलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

 



शिवाजी पार्कच्या विराट  सभेत  घणाघात

मुंबई : स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली असतीतर देश पाच दशके पुढे गेला असता. नैराश्याने ग्रासलेल्या आणि भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकललेअसा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवाजी पार्कवरील विराट विजय संकल्प सभेत बोलताना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवारभाजपाचे  राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेकेंद्रीय मंत्री नारायण राणेकेंद्रीय मंत्री रामदास आठवलेमनसे अध्यक्ष राज ठाकरे ,उद्योग मंत्री उदय सामंत,शालेय शिक्षण मंत्री,दीपक केसरकरपालकमंत्री मंगल प्रभात लोढाविधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हेभाजपा मुंबई अध्यक्ष,आशिष शेलार व महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांकरिता आयोजित प्रचार सभेत मोदी यांनी काँग्रेसी राजवटीचे अक्षरशः धिंडवडे काढले. काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी मुंबईची वाताहत करून मुंबईच्या विकासाला रोखून ठेवलेअसेही ते म्हणाले. सत्तेसाठी नकली शिवसेनेने मुंबईला धोका दिला आणि ते वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कुशीत जाऊन बसलेअशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. ज्यांनी मुंबईची वाताहत केलीमुंबईकरांना वेठीला धरलेत्यांना आता हे क्लीनचीट देत आहेत. याहून मोठा धोका कोणता असू शकतोअसा सवालही त्यांनी केला. धर्माच्या आधारावर आरक्षणास संविधान सभेचाही विरोध होता. पण इंडी आघाडीवाले धर्माच्या आधारावर आरक्षण वाटू पाहात आहे. आम्ही हे कदापि होऊ देणार नाहीअसा इशारा देत श्री. मोदी म्हणाले की आता मुंबईकरांची सर्व स्वप्नेसर्व संकल्प खंबीरपणे पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. येत्या पंचवीस वर्षांचा विकासाचा आराखडा आमच्याकडे आहेतर इंडी आघाडीच्या काँग्रेसच्या माओवादी जाहीरनाम्यातील घोषणांची अंमलबजावणी केलीतर देशाचे दिवाळे निघेल. काँग्रेसची नजर महिलांच्या मंगळसूत्रावर आहे. मंदिरांच्या संपत्तीवर आहेआणि वारसांच्या संपत्तीवर आहेया आरोपांचाही श्री. मोदी यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसची माओवादी विचारसरणी देशासमोरील मोठे संकट ठरेलअसा इशाराही त्यांनी दिला.मुंबई हे स्वप्ने जगणारे शहर आहे. स्वप्नेसंकल्प घेऊन येथे येणाऱ्या कोणासही या शहराने कधीच निराश केले नाही. मी देखील विकसित भारताचे स्वप्नसंकल्प घेऊन आज येथे आलो आहे. मुंबईला यासाठी मोठी भूमिका पार पाडायची आहेअसे सांगून श्री.मोदी म्हणाले कीजगातील अनेक देश स्वातंत्र्यानंतर आपल्यापुढे गेलेआपणच मागे पडलोकारण या देशाच्या नेतृत्वाने कधी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वासच ठेवला नाही. देशाचे पंतप्रधानच जेव्हा लाल किल्ल्यावरून देशवासीयांना आळशी म्हणत होतेजी सरकारेच असा विचार करतातते देशाला कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्ल्यानुसार जर काँग्रेस विसर्जित केली असतीतर आज भारत किमान पाच दशके पुढे गेला असता. भारताच्या सर्व व्यवस्थांचे काँग्रेसीकरण झाल्यामुळे देशाची पन्नास वर्षे बरबाद झाली. स्वातंत्र्य मिळालेतेव्हा भारत सहाव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था होता2014 मध्ये काँग्रेस सत्तेवरून पायउतार झालीतेव्हा देशाची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर गेली होती. गेल्या दहा वर्षांत आज देश जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक शक्ती म्हणून उभा आहे.





आज भारतातमुंबईतविक्रमी गुंतवणूक येत आहेआणि काही वर्षांतच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती झालेला असेलही माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला विकसित भारत दिल्याशिवाय जाणार नाहीयाकरिता दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि देशासाठी समर्पित असेलअशी ग्वाहीदेखील मोदी यांनी दिली.नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्यांच्या मनात आशा निर्माण करणे अवघड असते. निराश लोकांना कोणतीच गोष्ट शक्य वाटत नाही. राम मंदिरदेखील त्यांना अशक्य वाटत होतेकेव्हातरी जगाला हे वास्तव मान्य करावेच लागेलकी भारताची जनता आपले विचारनिर्धार आणि संकल्पावर एवढे ठाम होतेकी एका स्वप्नासाठी त्यांनी पाचशे वर्षे अविरत संघर्ष केला आहे. पाचशे वर्षे उराशी बाळगलेले राम मंदिराचे स्वप्न आज साकार झाले आहे. याच नैराश्यग्रस्तांना कलम 370 रद्द करणेही अशक्य वाटत होतेपण आता या अडथळ्यास आम्ही कब्रस्तानात गाडले आहे. आता ते पुन्हा प्रस्थापित करण्याची हिंमत जगातील कोणतीही शक्तीकडे नाहीअसा इशाराही त्यांनी दिला. 40 वर्षे महिला 33 टक्के आरक्षणाची प्रतीक्षा करत होत्या. आज संविधानाच्या नावाने ओरड करणाऱ्यांनी संसदेतील आरक्षण विधेयक फाडून फेकले होते. त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण दिले. सातत्याने गरीबीच्या नावाने जपमाळ करणाऱ्यांनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली होती. गरीबांना गरीबीतून बाहेर काढणे त्यांना अशक्य वाटत होते. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने 25 कोटी जनतेला गरीबीतून बाहेर काढले. जे त्यांना अशक्य वाटत होतेते आम्ही करून दाखविले. ही मोदींची नव्हेतुमच्या मताची ताकद आहेअसे ते म्हणाले. आपल्या पुढच्या पिढीचे उज्जवल भविष्यसुरक्षितताविकासभारताची जागतिक प्रतिष्ठायासाठी घराबाहेर पडा आणि आपल्या मताचा वापर करून देशाच्या विकासाची वाटचाल मजबूत कराअसे आवाहन त्यांनी केले. ज्यांनी जनादेश धुडकावून सरकार बनविलेत्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाशी शत्रुत्व पत्करलेत्यांनी मुंबईवर सूड उगवला. तिचा हक्क पुन्हा देण्यासाठी मोदी कटिबद्ध आहेतअशी ग्वाही देत त्यांनी मुंबईतील विकास प्रकल्पांची यादीच सादर केली. एनडीए आघाडीने गेल्या दहा वर्षांत सव्वा लाखाहून अधिक नवे स्टार्ट अप बनविले. आठ हजाराहून अधिक स्टार्टअप एकट्या मुंबईत आहेत. गेल्या दहा वर्षांत भारत मोबाईल निर्मितीत जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे. टेक्नॉलॉजी ते टेक्स्टाईल आणि प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी येत्या काळात निर्माण होतीलतेव्हा त्याचा सर्वात मोठा फायदा मुंबईलामुंबईच्या युवकांना होईलअशी ग्वाही त्यांनी दिली.


आता मराठीतही मेडिकल आणि इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम सुरू होतीलअसे त्यांनी सांगितलेतेव्हा श्रोत्यांनी टाळयांचा कडकडाट करून त्याचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवारकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या भाषणात मविआ आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. लांगूलचालनाच्या राजकारणापायी उद्धव ठाकरे यांना आता हिंदू शब्द उच्चारण्याचीही लाज वाटतेअसे श्री. फडणवीस म्हणाले. आता त्यांच्या सभांमधून पाकिस्तानचे झेंडे फडकतातटिपू सुलतानाचा जयजयकार होतोअसा आरोप फडणवीस यांनी केला.बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या काँग्रेसचा प्रचार उबाठा करत आहेतम्हणून बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकारही त्यांना नाहीअशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वसमावेशक सक्षम नेतृत्व मिळाले असून हे नेतृत्वच आपल्याला व देशाला प्रगतीच्या शिखरावर नेणार आहे. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा राहिला नसल्याने ते असंबद्ध शब्द वापरत केविलवाणी भाषणे करून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहेत असा आरोप अजितदादा पवार यांनी केला. संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नकाअसे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच मविआचा एकाच वाक्यात समाचार घेतला. जे सत्तेतच येणार नाहीतत्यांच्याबद्दल कशाला बोलायचेअसे ते म्हणाले. मोदीजी होते म्हणून राम मंदिर झाले. मोदीजी होते म्हणून 370 कलम रद्द झाले. मोदीजी होते म्हणून तिहेरी तलाक पद्धती रद्द होऊन शाहबानोला न्याय मिळाला. इतकी वर्षे जे झाले नाहीते करून घेणे सर्वात महत्वाचेम्हणून मी मोदीजींसोबत आहे. पुढच्या पाच वर्षाकरिता आमच्या आपल्याकडून अनेक अपेक्षा आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावादेशाच्या अभ्यासक्रमात सव्वाशे वर्षांच्या मराठा साम्राज्याचा इतिहास समाविष्ट करावाशिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावीदेशात अनेक ठिकाणी उत्तम रस्ते आहेतगेल्या 18-19 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावासंविधानाला धक्का लागणार असा प्रचार करणाऱ्यांना एकदाच खणखणीत उत्तर देऊन त्यांची तोंडे बंद कराअशा अपेक्षा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या. मुंबईच्या लाखो रेल्वे प्रवाशांच्या सुविधा अधिक चांगल्या होतीलयाकडे लक्ष द्याअसे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.

नैराश्याने ग्रासलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले : पंतप्रधान नरेंद्र मोदी नैराश्याने ग्रासलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले : पंतप्रधान नरेंद्र  मोदी Reviewed by ANN news network on ५/१७/२०२४ १०:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".