बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला

संगमेश्वरात डिंगणी येथील घटना; वनविभागामार्फत तपास सुरु

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी चाळकेवाडी या ठिकाणी दि.१७ मे २०२४ रोजी सकळी ८ वाजता रस्त्यालगत वन्यप्राणी बिबट्याचा बछडा हा मृत अवस्थेत पडला असल्याबाबत पोलीस पाटील, डिंगणी यांनी दूरध्वनीव्दारे वनविभागास कळविले. माहितीच्या अनुषंगाने वनपाल, संगमेश्वर यांनी रेस्क्यू टिमसह घटनास्थाळी जाऊन पाहाणी केली आहे.

     वनक्षेत्रपालांनी पंचासमवेत घटनास्थळी जावून पंचनामा केला. बिबटया हा अंदाजे तीन ते चार महिने वयाचा मादी प्रजातीचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मानेवर दाताच्या खोल खुणा दिसून आल्या व त्या जखमेतून रक्तमिश्रीत पाणी वहात असल्याचेदेखील दिसून आले. 

पायाच्या वरील बाजूस जखम असल्याचे आढळले. मृत बछड्याच्या शरिराची मापे घेवून शव ताब्यात घेण्यात आले. पुढे पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुखमार्फत शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू हा वन्यप्राण्याच्या हल्यात जखमी होवून झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. 

वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्यामार्फत पंचासमक्ष मृत बिबट्यास त्याच ठिकाणी लाकडाची चिता रचून दहन करुन नष्ट करण्यात आले. 

     बिबट्याच्या मृत्यूबाबतचा अधिक तपास विभागीय वन अधिकारी (चिपळूण) गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) अ.का. वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल  प्रकाश सुतार व त्यांचे अधिनस्त वनपाल संगमेश्वर, वनरक्षक, कडुकर व वनरक्षक कराडे हे करत आहेत.

मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्यासाठी वनविभागाचा टोल फ्रि क्र.१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक वनसंरक्षक श्री. बोराटे यांनी केले आहे.

 

बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला Reviewed by ANN news network on ५/१८/२०२४ ०८:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".